महाराष्ट्र


भागीरथी महिला संस्थे तर्फे पाच लाख रुपयांच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा ३आक्टोंबरला
  • Published at : 19-09-2018 16:43:44

कोल्हापूर/प्रतिनिधी धनंजय महाडिक युवाशक्ती आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने बुधवार दिं.३ ऑक्टोंबर रोजी मार्केट यार्ड मधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे झिम्मा फुगडी महिलांच्या पारंपारिक खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी ५लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या वर्षी खास वैशिष्ट्य म्हणून १५ते २०वयोगटातील ५०हजार बक्षीसांची वेगळी सांघिक स्पर्धा होणार आहे. अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने गेले ९ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. खासदार धनंजय महाडिक व सौ.अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा प्रचंड यशस्वी लोकप्रिय बनली आहे. गेल्या वर्षी सुमारे१२ हजार महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. झिम्मा, घागर घुमविणे,उखाणे,सूप नाचविणे, काटवट काणा,छुईफुई, जात्यावरील ओव्या,फुगडी, घोडा घोडा,पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून यंदा १५हजाराहून अधिक महिला युवती या स्पर्धेत सहभाग घेतील.अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह ,दुसऱ्या क्रमांकासाठी २०हजार रुपये आणि सन्मान चिन्ह ,तिसऱ्या क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह,तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी ५हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच ५०१ रुपयापासून २ हजार रुपये पर्यंत वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत .तर १५ते २० वयोगटातील मुलींसाठी खास ५० हजार रुपये बक्षीसांचा वेगळाच सांघिक झिम्मा आयोजित करण्यात आला आहे .गेल्या नऊ वर्षात युती आणि महिलांना शासन करण्यासाठी कळी उमलताना... हा प्रमुख उपक्रम, मोफत वाटप मोफतआरोग्य शिबिर ,मोफत हेल्मेट वाटप, वक्षारोपण ,महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण,बचत गटांना मोफत स्टाँल, मिस आणि मिसेस भागीरथी स्पर्धा, युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबीर, रक्तदान शिबिर ,वाचनाची सवय लागण्यासाठी गावोगावी वाचनालये सुरू करणे. असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधींकडे आणि भागीरथीच्या कैलास टाँवरवरील कार्यालयात करण्यात आली आहे मंगळवार २५ सप्टेंबर ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेसाठी सुमारे ४०परीक्षक, १५ निवेदिका आणि ६० स्वयंसेवकांची टीम सज्ज आहे. स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना सहजसेवा ट्रस्टच्या वतीने मोफत जेवणाची सोय करण्यात येणार आहे. जीएस चहा हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत .असे सौ.महाडिक यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला शाहीर राजू राऊत, प्रा.आनंद गिरी, सुखदा कुलकर्णी यांच्यासह भागीरथीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.