महाराष्ट्र


नेबापूरचा ५२ वर्षांचा ' एक गाव एक गणपती ' गणेशोत्सव
  • Published at : 19-09-2018 15:29:54

पन्हाळा प्रतिनिधी: नेबापूर हे पन्हाळगडाच्या पायथ्याला वसलेलं सुमारे १००० लोकवस्तीच, १२ बलुतेदारानांच एक छोटंसं गाव.या गावाला नरवीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.तशीच श्री यादवेन्द्र स्वामी यांची आध्यात्मिक परंपरा ही आहे.आणि याशिवाय आणखी एक विशेष परंपरा आहे ती म्हणजे ५२ वर्षे अविरत ' एक गाव एक गणपती ' या सार्वजनिक गणेशोत्सवाची . समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मनुष्य हा फक्त सुशिक्षित असणे पुरेसे नाही तर तो सुसंस्कारी ही असणे अतिआवश्यक असतं.आणि अशी सुसंस्कारी लोकं काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेबापूर चा सार्वजनिक गणेशोत्सव .तसं पहिलं तर हा खूपच भव्य , दिव्य आणि अगदी विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेला गणेशोत्सव नसला तरी आसपासच्या सर्व गणेशोत्सवा मध्ये त्याने नक्कीच वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे .आणि त्याचे प्रत्येक गोष्टीत उठून दिसणारे वेगळेपण हीच त्याची ओळख आहे . या गणेशोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील .१}. ५२ वर्षे अविरतपणे ' एक गाव एक गणपती ' ही संकल्पना २} ५२ वर्षे शाडूची', हाताने बनवलेली सुबक मूर्ती ३} पारंपरिक वाद्य व भजनाच्या गजरात निघणारी मिरवणूक ४} स्वयंप्रेररीत , विना पोहोच देणगीद्वारे होणारा गणेशोत्सव ५} सामजिक सलोख्याची भावना जपणारा गणेशोत्सव साधारणता १९६५ मध्ये या गावातील काही तरूण मंडळींनी एकत्र येऊन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.यासाठी गावातीलच मुर्तीकाराकडे मूर्ती ठरवली , त्यासाठी आवश्यक वर्गणी गोळा केली गेली.गावातीलच शाळेजवळील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभारून त्यात मूर्ती बसवली.आरास करण्यासाठी झाडे, वेल, पाने, फुले यांचा वापर केला.शेवटच्या दिवशी खीरीचा गोड प्रसाद करून भजनी मंडळाच्या मदतीने वाजत गाजत गणेशमूर्तीची मिरवणूक काढून विसर्जन केले गेले.आणि अशा तऱ्हेने या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या उत्सवाची सुरवात करण्यात स्व.शामराव राऊत , भीमराव कदम , दत्तात्रय कुंभार , रघुनाथ कुंभार , आकाराम कुंभार ,आण्णापा सोरटे , आकाराम सोरटे , हरिभाऊ खामकर , महादेव कुंभार , रघुनाथ काशीद , तसेच श्री .विट्ठल काशीद , पांडुरंग पाटील , रंगराव कांबळे , रामराव लोहार , राजाराम जामदार , केदारी पाटील व पांडुरंग काशीद इ.तरुणांनी पुढाकार घेतला होता . .