महाराष्ट्र


भाजप सरकारचा महामंडळानंतर मंत्री मंडळाचा विस्तार
  • Published at : 19-09-2018 15:07:48

मुंबई : महामंडळ वाटपानंतर आता राज्यात १० ऑक्टोबरला फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे. सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या मंत्रिपदाच्या एकूण चार जागा रिक्त आहेत. यापैकी सेनेचा १२ मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का, की विलासराव देशमुखांप्रमाणे इच्छुकांना झुलवत ठेवण्याचं धोरण फडणवीस सरकार कायम ठेवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान एकनाथ खडसे यांचं या मंत्रीमंडळ विस्तारात कमबॅक होणार नसल्याचं अधिक सुत्राकडून समजतंय.