महाराष्ट्र


लालबागचा राजाला सोन्याची मूर्ती
  • Published at : 19-09-2018 15:02:10

मुंबई : परळमधील 'लालबागचा राजा' गणपतीला दरवर्षी भाविक भरभरून दान देतात. यावर्षीही एका भाविकाने बाप्पाला त्याचीच सोन्याची प्रतिकृती दान केली आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तिची किंमत तब्बल 42 लाख रुपये इतकी आहे. तसेच मूर्तीच्या मुकुटात हिराही आहे. अवघ्या पाच दिवसात 'लालबागचा राजा'च्या चरणी 2 कोटी 64 लाखांचे दान जमा झाले आहे. 'लालबागचा राजा'ला अर्पण केलेली त्याची सोन्याची प्रतिकृती ही 1 किलो 271 ग्रॅमची आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती भरीव आहे. अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे 1 लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते.