महाराष्ट्र


हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही- मोहन भागवत
  • Published at : 19-09-2018 14:59:38

दिल्ही प्रतिनिधी : नवी दिल्‍ली येथे विज्ञान भवनमध्ये राष्‍ट्रीय स्‍वंयमसेवक संघाची तीन दिवसीय व्याख्यानमालेत भागवत यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. ते म्‍हणाले की, ‘‘आम्‍ही म्‍हणतो की, हे हिंदु राष्‍ट्र आहे. याचा अर्थ हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही. ज्‍यादिवशी या देशात मुस्लीम नसायला पाहिजेत असे वाटेल त्‍या दिवशी या देशात हिंदुत्‍वही राहिलेले नसेल. हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे.’’संघाचा राजकारणाशी काही संबध नाही आणि आम्‍ही राजकीय हस्‍तक्षेपही करत नाही. नागपुरहून कोणाला फोन जात नाही. परंतु, राष्ट्रीयत्वाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही नक्कीच सर्वोत्तम प्रयत्न करतो. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले. याबरोबरच भागवत म्‍हणाले की, या देशात मुस्लीम राहिले नाहीत तर हिंदुत्‍वही राहणार नाही.