महाराष्ट्र


तीन तलाक ला कॅबिनेटची मंजुरी
  • Published at : 19-09-2018 14:44:54

नवी दिल्ली :मोदी सरकारनं 'तीन तलाक'वर कायदा बनवण्यासाठी अध्यादेशाचा मार्ग निवडलाय. केंद्र सरकारनं तीन तलाक अध्यादेशाला मंजुरी दिलीय. बुधवारी कॅबिनेटमध्ये झालेल्या बैटकीत ही मंजुरी देण्यात आलीय. काँग्रेसनं मात्र या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. मोदी सरकार या प्रश्नाचं राजकीय भांडवल करत असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. मोदी सरकार मुस्लिम महिलांना न्या देण्यासाठी नाही तर राजकीय मुद्दा बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाल यांनी म्हटलंय. राज्यसभेत तीन तलाकचं विधेयक राज्यसभेत अडकल्यानंतर केंद्र सरकारनं अध्यादेशाचा पर्याय निवडला. लोकसभेत यापूर्वीच तीन तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळालीय.