महाराष्ट्र


गोव्यात होणार राजकीय भूकंप
  • Published at : 17-09-2018 18:38:12

गोवा प्रतिनिधी:गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांवर सध्या दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचं एक शिष्टमंडळ राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटण्यासाठी राजभवनावर गेलं होतं. मात्र राज्यपाल या गोव्याबाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. कवळेकर म्हणाले राज्यपालांच्या ऑफिसमध्ये आम्ही दोन निवेदनं दिली आहेत. राज्यात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. पर्रिकर सरकार चालवण्यास सक्षम नसतील तर कांग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे. मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासनावर कुणाचाही धाक नाही त्यामुळं राज्यात अनागोंदी आहे. सरकार असूनही नसल्यासारखं आहे अशी टीकाही त्यांनी केली.