महाराष्ट्र


आजऱ्यात ‘यशोगाथा’ प्रकाशन
  • Published at : 16-09-2018 18:45:09

आजरा प्रतिनिधी ( सचिन चव्हाण ) आजरा-गडहिंग्लज परिसरातील चळवळीचे लढे आणि लढवय्ये काळाच्या ओघात गडप होत आहेत. इतिहासाशी गद्दारी न करता त्यांच्या लढ्याची नोंद घेणे आवश्यक असते. चळवळींचे काही ‘वाद’ आधार असले, तरी सर्वांनी समन्वयाने एकमेकांचा हात हातात घेत पुढे जाणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे चळवळीत कार्यकर्त्यांनी पारदर्शी व निष्कलंक असावे, अन्यथा क्षीण होणाऱ्या चळवळी नामशेष होतील, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी आजऱ्यात केले. आजरा परिसरातील सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींचा नेमकेपणाने वेध घेणाऱ्या संपत देसाई यांच्या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि चर्चा कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. आय. ए. एस. अधिकारी आप्पासाहेब धुळाज (नागपूर), कवी अजय कांडर (कणकवली), डॉ. रणधीर शिंदे, महेश पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नवनाथ शिंदे यांनी स्वागत तर, रवी शेंडे यांनी प्रास्ताविक केले. श्री. धुळाज म्हणाले, धरणग्रस्त समस्यापूर्तीतील अंमलबजावणीत शासकीय विभागांत समन्वयाचा अभाव असतो. त्यातुनही समस्यांची सोडवणूक होण्यासाठी ‘प्रेशर ग्रुप’ प्रभाव गरजेचा असतो. चळवळ तेच काम करते. ‘चित्री’ साकारण्यात धरणग्रस्त चळवळीचे आणि त्यांच्या नेत्यांचे योगदान मोठे आहे. तळागाळातल्या सर्वाना गोळा करीत असा संघर्ष करणे, हे जिकिरीचे असते. म्हणूनच तो लोकलढा ठरतो. अशा लोकलढ्याच्या यशस्वीतेमुळेच बारमाही पाणी मिळते, शेती फुलते. पण त्यामागे आजरेकर प्रकल्पग्रस्तांचा मोठा त्याग आहे. हे चळवळ्यांचे लोकलढे तळागाळातल्यांचे असल्याने त्याचे महत्व मोठे आहे. त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी समन्वय ठेवावा. अजय कांडर म्हणाले, नव्वदीनंतर चळवळीला ग्रहण लागले. पण आजऱ्यात मात्र तिने बाळसे धरले, ‘चित्री’ उभे राहते, ही केवळ चळवळ्यांची नव्हे तर सर्वांसाठीच ही स्तुत्य बाब आहे. आधुनिकीकरणात माणूस आणि निसर्गाची सांगड नसल्याने अनेक प्रकल्पांच्या निर्मितीत समाज उध्वस्त होत आहे. मेंदू गहाण ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे हे घडते. आजऱ्यातील चळवळीत मात्र हे झाले नाही, म्हणून येथील लोकलढा खऱ्या अर्थाने यशोगाथा ठरते. देसाईंनी आता कादंबरीलेखनाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले. संपत देसाई म्हणाले, सामाजिक चळवळीतील अद्याप अनेक बाबी या पुस्तकात येणे अपेक्षित आहे, तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असेन. महेश पेडणेकर म्हणाले, भयावह परिस्थिती निर्माण करणाऱ्या व्यवस्थेत सामान्यजन कठपुतळी आहेत. अशा माणसांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठीच लेखन मानणाऱ्यांची ‘यशोगाथा’ ही साहित्यकृती आहे. म्हणून ती वांझोटी नाही. स्वतः संघर्ष करणाऱ्याच्या स्व-अनुभूतीमुळे या पुस्तकास वेगळे मूल्य लाभले आहे. रणधीर शिंदे यांचेही भाषण झाले. राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुनील शिंत्रे, अंकुश कदम, श्रीपतराव देसाई, रावसाहेब सरदेसाई, नितीन पाटील, अंकुश कदम,