महाराष्ट्र


चालकाचा अचानक ताबा सुटलामुळे केएमटी घसरली
  • Published at : 12-09-2018 12:13:47

कोल्हापूर: समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने लक्षतीर्थ वसाहत येथील पाणंद रोडवर केएमटी बस रस्त्याजवळील खड्यात अडकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी घाबरुन गेले. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. मात्र कोणीही जखमी झालेले नाही. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहत बस थांब्यावरून भवानी मंडपकडे केएमटी बस धावली. लक्षतीर्थ येथील पाणंद येथे एका वळणावर चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याशेजारी खड्यात अडकली. घाबरुन गेलेले प्रवासी तातडीने बसमधून उतरले.