महाराष्ट्र


भाजप, सेनेचे संख्याबळ वाढणार!
  • Published at : 25-06-2018 17:10:08

मुंबई- विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै राेजी निवडणूक हाेत अाहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता अपक्षांच्या मदतीने भाजप पाच जागांवर विजय मिळवू शकतो, त्यामुळे सध्या २१ जागांवर असलेला भाजप २४ जागांवर जाईल तर राष्ट्रवादीला तीन जागांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची संख्याही ११ वर गेली असून त्यांना आणखी एका जागेचा लाभ होऊ शकताे. राष्ट्रवादीचे संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी होणार असल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची चिन्हे अाहेत. सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित आणि जयदेव गायकवाड (राष्ट्रवादी), विजय गिरकर (भाजप), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे (काँग्रेस), महादेव जानकर (रासपा- भाजप), अनिल परब (शिवसेना) आणि शेकापचे जयंत पाटील यांची मुदत जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ २१ वर तर शिवसेनेचे ११ वर पोहोचले आहे. राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवल्याने २० वर आले आहे तर काँग्रेसचे संख्याबळ १८ वर आले आहे.