महाराष्ट्र


आरळेत अम्बुबाची महोत्सव
  • Published at : 25-06-2018 16:15:08

कांचनवाडी /वार्ताहर - क॥आरळे ता.करवीर येथे कामाख्या देवी अम्बुबाची महोत्सवासाठी पहाटेपासुन भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी. आज सकाळी प्रकाश गुरव यांच्या हस्ते अभिषेक व विविध धार्मिक विधी पुर्ण करून मंदिराचा दरवाजा उघडला मासिक धर्माचा कालावधी म्हणून गेले चार दिवसा करीता हा दरवाजा बंद ठेवला होता दरवाजा उघडताच पंचक्रोशीतील भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती देवीच्या 51 शक्तीपिठा पैकी एक शक्तीपिठ कामाख्या देवी. जगभरात आसाम नंतर या देवीचे शक्तीपिठ कोल्हापूर पासून 25 कि. मी. अंतरा वरील कसबा आरळे ता. करवीर येथे आहे दोन्ही ठिकानची देवीच्या धार्मीक कार्यक्रमांची पध्दत सारखीच आहे