महाराष्ट्र


सोनाळी येथे अविवाहित युवकाची आत्महत्या
  • Published at : 25-06-2018 16:06:16

राम पाटील कांचनवाडी/वार्ताहर - सोनाळी ता.करवीर येथील गुरूनाथ रघुनाथ पाटील (वय-२२) याने जनावारांच्या घरात नाॅयलानच्या दोरीने गळफास लावून शनिवारी दि.२२रोजी दुपारी आत्महत्या केली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भाटणवाडी ता.करवीर येथे त्याचा इलेक्ट्रॉनिक दुकानचा स्वताचा व्यवसाय होता अविवाहित गुरूनाथचा जुलै महिन्यात २ तारखेला लग्न शुभारंभाचा कार्यक्रम होता. घरगुती किरकोळ कामे व रंगरंगोटीची कामे चालू असताना दुपारच्या वेळेत सर्वांना जेवन वाडून स्वतः आलोच म्हनुन जणावारांच्या शेडात तुळईला नायलॉनचा दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही घटनेची नोंद करवीर पोलिस स्टेशन कोल्हापूर येथे झाली आहे.