महाराष्ट्र


वृक्ष भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपत केला आगळा वेगळा साखरपुडा.
संदीप नार्वेकर यांनी दिला समाजासाठी अनमोल संदेश.
  • Published at : 25-06-2018 15:52:27

सेनापती कापशी / अवधूत आठवले. सध्या सगळीकडे वाढत चाललेली वृक्षतोड , ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण अशा अनेक गोष्टीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे त्यामुळे मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम होत चालला आहे या गोष्टींवर उपाययोजना व सामाजिक बांधिलकी राखत समाजासाठी संदेश देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी या छोट्याशा गावातील संदीप सूर्यकांत नार्वेकर हा युवक पुढे सरसावला आहे. त्याने जुन्या हुंडा, आहेर या परंपरेना फाटा देत कागल तालुक्यातील कुरुकली येथील सीमा मदन बेलवलकर हिच्याशी होत असलेल्या साखरपुड्याच्या समारंभात चक्क आपल्या होणाऱ्या पत्नीला वृक्षभेट देऊन व त्यांच्याकडूनही स्वीकारून साखरपुडा केला. तसेच संपुर्ण मुलीच्या कुटुंबाला व त्यांच्याकडून आपल्या कुटुंबाला वृक्षभेट देऊन हा आगळा वेगळा साखरपुडा समारंभ उत्साहात पार पडला व समाजासाठी एक चांगला संदेश दिला. या आगळ्या वेगळ्या समारंभामध्ये दोन्ही कुटुंबे, वधू वर अतिशय उत्साहात होते. या साखरपुढ्याची चर्चा व त्यांचे कौतुक गडहिंग्लज व कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. संदीप स्वतःचा टूर ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करत करत त्याला कलेचीही आवड आहे त्याने अनेक मालिका मधेही अभिनय केला आहे. लवकरच याच विषयावर आधारित असणारा फांदी सिनेमा येत आहे त्यामध्ये संदीप याने अभिनय केला आहे. समाजात दर वर्षी किमान 10 ते 15 हजार लग्न होतात जर 15,000 लग्नात 15,000 वृक्षारोपण केले तर निसर्गाचा समतोल राहील व भविष्यात निसर्गातून मानवी जीवनावर होणारी हानी नक्की टळेल व नवदांपत्यांच्या भविष्या बरोबर त्यांच्या भावी पिढीचे आयुष्यही व इतरांचे ही जिवन फुलेल व वृक्षभेट देऊन केलेला साखरपुडा माझ्या आयुष्यातील एक मोठा क्षण असून तो मी कधीही विसरणार नाही असे त्यांनी मत व्यक्त केले. फोटो मेल केला आहे फोटो ओळ - साखरपुडाप्रसंगी वर संदीप व वधू सीमा वृक्षभेट देताना.