महाराष्ट्र


प्लॅस्टिक बंदी बाबत संभ्रम
  • Published at : 24-06-2018 17:51:22

मुंबई प्रतिनिधी: राज्यभरात आज प्लॅस्टिकबंदीच्या कारवाईचा दुसरा दिवस आहे. मात्र, कारवाईदरम्यान महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत. प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम, प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे ज्या दुकानदारांकडून दंडाची वसुली होत आहे त्यांच्या मनात प्लॅस्टिकबंदीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत नेमकी माहिती न देता सरसकट कारवाईला विरोध होत आहे. कोणत्या प्लॅस्टिकवर बंदी आहे आणि कोणत्या नाही त्याबाबत पुरेशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचं दुकानदार सांगत आहेत. दरम्यान या प्लॅस्टिकबंदीबाबत सर्व सामान्य जनतेची काळजी जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हालाही आहे असा टोला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनसेला लगावला आहे. तर या प्लॅस्टिक बंदीवरून राजकारण न करण्याचा सल्लाही रामदास कदमांनी राजकारण्यांना दिला आहे. तर सर्वपक्षियांनी भविष्याचा धोका टाळण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.