महाराष्ट्र


कोल्हापूर शहरात प्लास्टिक बंदी विरोधात पहिला दंड
  • Published at : 23-06-2018 17:12:41

कोल्हापूर / प्रतिनिधी : प्लास्टिक बंदीसाठी कोल्हापूर महापालिकेने कडक धोरण अवलंबिले आहे. आज प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कोल्हापूर शहरात प्लास्टिक बंदी विरोधात पहिला दंड आकारला गेला आहे. येथील शाहूपुरी परिसरातील जोधपुर स्वीट्स या दुकानाला दंड झाला आहे. हा दंड पाच हजार रुपयांचा आहे. या पावतीत प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्याबाबत ही कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे.