महाराष्ट्र


मराठा महासंघाच्या वतीने उद्या राजर्षी शाहूंचे चित्रमय प्रदर्शन
  • Published at : 23-06-2018 15:48:41

कोल्हापूर / प्रतिनिधी- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहूंचे विचार दर्शन व चित्रमय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रविवारी (ता.२४) राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कलादालनात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संशोधनातून प्रदर्शनाची मांडणी करण्यात येणार आहे. प्रदर्शनात शाहूंची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांच्या स्वाक्षरीचे अस्सल ठराव, त्यांनी बांधलेल्या वास्तूंची चित्रे मांडण्यात येणार आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता उद्योजक समीर काळे यांच्या हस्ते व माजी महापौर आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. २७ जूनअखेर सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. रविवारी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचे 'राजर्षी शाहूंची प्रशासन व्यवस्था' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉ. पद्मा पाटील यांच्या 'मानवी अधिकारांचा पुरस्कर्ता : राजा शाहू महाराज' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.