महाराष्ट्र


राष्ट्रीयीकृत बँकेच्या आजी-माजी अध्यक्षाविरुद्ध कारवाई पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता
  • Published at : 23-06-2018 15:14:02

पुणे: प्रतिनिधी- बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीनं कर्ज दिल्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात येत असलेल्या ‘एमपीआयडी’ कलमाखाली बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाई केली. परंतु कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या आजी-माजी अध्यक्षाविरुद्ध कारवाई करत असताना याबद्दल रिझर्व्ह बँकेला कळवणं आणि त्यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं. मात्र, पुणे पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला याची कल्पना न देताच ही कारवाई केली. यामुळं हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक करणारे पोलीसच आता गोत्यात आले आहेत. अटक करताना पोलिसांनी स्वत: नियम पायदळी तुडवल्याचं समोर आलं आहे.