महाराष्ट्र


दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
  • Published at : 14-06-2018 15:09:17

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील पनारच्या जंगलात चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांशी लढताना एका जवानाला वीरमरण आलं. काश्मीरच्या उत्तरेकडील बांदीपोरात गेल्या सहा दिवसांपासून अनेकदा भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झडल्या. एएनआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झडली. यात जवानांनी दोन दहशतवाद्यांना टिपले. तर एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पनारच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर १४ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली होती.