महाराष्ट्र


जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीसाठी उद्या मतदान
  • Published at : 14-06-2018 14:52:33

कोल्हापूर /प्रतिनिधी : येथील जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी (दि. १५) रोजी मतदान होत आहे. तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिसून असून बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. प्रशांत देसाई व अ‍ॅड. प्रकाश आंबेकर यांनी अर्ज भरले आहेत. या तिन्ही पॅनेलमध्ये जोरदार लढत होत आहे. बुधवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सेक्रेटरीपदासाठी प्रत्येकी तीन, जॉर्इंट सेक्रेटरी पदासाठी चार, लोकल आॅडिटरसाठी तीन, महिला प्रतिनिधीसाठी तीन आणि सदस्य पदांसाठी २३ वकिलांनी अर्ज भरले आहेत. गेले चार दिवस उमेदवारांनी घरटी मतदारांची भेट घेणाऱ्यावर भर दिला आहे. गुरुवारी प्रचाराचा शेटवचा दिवस असल्याने दिवसभरात छुप्या घडामोडींना वेग येणार आहे. तिन्ही पॅनेल ताकदीने रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अटीतटीची होत आहे. शुक्रवारी कसबा बावडा येथील न्यायसंकुल इमारतीमधील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणाार आहे.