महाराष्ट्र


वाजपे यांच्या तब्बेतीत सुधारणा
  • Published at : 13-06-2018 18:26:19

नवी दिल्ली/ प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून एम्समध्ये उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली असल्याचे एम्स हॉस्पिटलने आपल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. येत्या काही दिवसांमध्ये वाजपेयी यांना घरी सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. वाजपेयींच्या प्रकृतीबाबत माहिती देताना एम्सचे डॉक्टर म्हणाले की, गेल्या ४८ तासांमध्ये वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसले. आता त्यांचे मूत्रपिंडही चांगले काम करत करू लागले आहे. त्यांचा रक्तदाब आणि हार्ट रेटदेखील उत्तम आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते अगदी ठणठणीत होतील आणि त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ११ जून या दिवशी वाजपेयींना एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. परंतु, तपासणीनंतर मूत्रसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र चिंता निर्माण झाली.