महाराष्ट्र


बांधकामे जोमात मेढा नगरपंचायत कोमात
  • Published at : 13-06-2018 18:17:52

सातारा / प्रतिनिधी : मेढा नगरपंचायतीने अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा देवून बांधकामाविषयी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या नोटींसींची तिशी पूर्ण होत असूनही बांधकाम मात्र जोमात आणि नगरपंचायत कोमात " असे चित्र पहावयास मिळत आहे. मेढा नगरपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील अनाथिकृत बांधकामांचा सव्हें करून अशा बांधकाम धारकांना ११ मे २०१८ रोजी तातडीने नोटीसा पाठवून आपली बांधकामाविषयी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करणे कामी तीस दिवसांचा अवधी दिला होता . मात्र या नोटीसीना काही जणांनी स्विकारून काम बंद ठेवली तर काही धनाढय मंडळींनी केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करून बांधकाम चालू ठेवण्याचे काम सुरू ठेवले आहे. यांना नक्की कोणाचे बळ आहे, नागरिकांच्या मागण्यांना कोलदांडा देवून त्यांचे समस्यांचे निवारण करण्याऐवजी महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, विज वितरण इत्यादी खात्यांचे अधिकारी जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत हे कोडे उलगडत नाही याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच या बांधकामाविषयी मेढा नगरपंचायत चक्क "गांधारीची " भुमिका पार पाडत असल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे. मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, बांधकाम सभापती , मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नोटीसा देवूनही या सर्वांना डावलून हे बांधकाम पुर्णत्वाकडे जात असून या अनधिकृत बांधकामाविषयी नगरपंचायतीमध्ये माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पूढे आली आहे .या नोटीसींना अद्यापही कोणतेच उत्तर मिळाले नसून अनाधिकृत बांधकाम धारकांपैकी कोणीही आपली बांधकामा विषयाची कागदपत्रे जमा केली नसून नगरपंचायतीच्या काही पदाधिकारी यांना हाताशी धरून सर्रासपणे ही बांधकामे बांधली जात असून यात नक्की काहीतरी गौडबंगाल असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे करून स्वतःला श्रेष्ठ मानणारे काही धनाढयांना कोण मदत करत आहे हे जनतेला माहित असून मेढा नगरपंचायत यांच्या विषयी काय पाऊले उचलणार , त्यांना नगरपंचायत काय शासन करणार, नगरपंचायतीने नोटीसा बजावताना कागदपत्रे जमा करावी त्यानंतर बांधकाम करावे असे सुचित करून ही नोटीसांचा अवमान करुन बांधकाम पूर्ण केल्या बाबत धनदांडग्यांवर उचित कारवाई होणार ? याकडे संपूर्ण मेढा नगरीचे लक्ष लागून राहिले आहे.