महाराष्ट्र


मुंबईतील प्रभादेवी इथल्या बो मोंड टॉवरला भिषण आग
  • Published at : 13-06-2018 17:25:00

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईतील प्रभादेवी इथल्या बो मोंड टॉवरला लागलेली आग आता आटोक्यात आलीये. या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीच्या ३२ आणि ३३व्या मजल्यावर ही आग लागली होती. प्रभादेवी इथं बो मोंड हा टाॅवर आहे. या टाॅवरमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसह अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचे या इमारतीत फ्लॅट्स आहेत. दीपिकाचा या सोसायटीत २६ व्या मजल्यावर फ्लॅट आहे. मुंबई फायर ब्रिगेडच्या २२ गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ९५ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे.