महाराष्ट्र


श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहली
  • Published at : 06-06-2018 14:53:45

न्यूयॉर्क / वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आता जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला आहे. फोर्ब्ज नियतकालिकाने त्याला हा दर्जा दिला आहे. अमेरिकन बॉक्सिंग चॅम्पियन फ्लॉइड मेवेदर पहिल्या स्थानावर आहे. फोर्ब्जचा या यादीत विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याचा क्रमांक ८३ वा असून तो २४ दशलक्ष अमेरिके डॉलर्स इतके कमावत असल्याचा फोर्ब्जचा अंदाज आहे. 'जगातल्या सर्वाधिक पैसे घेणाऱ्या खेळाडूंच्या' या यादीत एकाही महिलेचे नाव नाही. 'कोहलीचं आकर्षण केवळ भारतीय क्रिकेटजगतात नाहीत तर तो जगातही प्रसिद्ध आहे. त्याचे टि्वटरवर फॉलोअर (२५ दशलक्षांहून अधिक) देखील भरपूर आहेत,' असं फोर्ब्जने म्हटलं आहे. यावर्षी बीसीसीआयने केवळ पाच खेळाडूंना ए प्लस कंत्राटाच्या करारावर घेतले आहे, त्यापैकी एक कोहली आहे. या करारानुसार, वार्षिक १ दशलक्ष डॉलर्स इतक्या उत्पन्नाची हमी देण्यात आली आहे. खेळाव्यतिरिक्त कोहली पुमा, पेप्सी, ऑडी, ओकले अशा टॉप ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांच्या जाहिरातीदेखील करतो.