महाराष्ट्र


राजे बँकेचा २५ टक्के लाभांश जाहीर
  • Published at : 31-05-2018 15:43:18

कागल //प्रतिनिधी - येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅप. बँकेचा सन २०१६-१७ यावर्षी शतकमहोत्सव साजरा झाला. शतकमहोत्सवानिमित्त या बँकेने सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर केला होता. अशा प्रकारचा लाभांश जाहीर करणारी ही राज्यातील एकमेव पहिलीच बँक असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदे दिली. बँकेला गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या बँकेने विशेष दबदबा निर्माण केला आहे. त्यावर कळस चढविण्याचे काम शाहू ग्रुपचे अध्यक्ष व बँकेचे मार्गदर्शन समरजितसिंह घाटगे करीत आहेत. गेल्या वर्षी शतकहोत्सवी वर्षात सभासदांनी चांगला लाभांश मिळावा, अशी मागणी केली होती. त्यास अनुसरुन बँकेने त्यांच्या मागणीचा विचार करुन २५ टक्के लाभांश जाहीर केला होता. मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार १५ टक्केच लाभांश देता येतो. त्यामुळेे बँकेच्या सभासदांच्या मागणीचा विचार करुन जादा १० टक्के लाभांश देण्यासाठी सहकार आयुक्त पुणे यांचेकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र सहकार आयुक्तांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यानंतर बँकेने सहकार मंत्र्यांकडे आपील केले. व त्यांच्यासमोर सुनावणी होवून रिझर्व्ह बँकेचे निकष या बँकेने पूर्ण केल्याने १० टक्के वाढीव लाभांश शतकहोमत्सवी वर्षानिमित्त देण्यास बँकेला मान्यता मिळाली .