महाराष्ट्र


बँक कर्मचाऱ्यांचा ३०-३१ रोजी संप, कामकाज राहाणार ठप्प
  • Published at : 26-05-2018 15:44:38

मुंबई - बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात फक्त २ टक्के वाढ करण्यात आली आहे. इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) घेतलेल्या या निर्णयाविरोधात देशभरातील १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ३० व ३१ मे रोजी बँकांचे कामकाज ठप्प राहाणार आहे. वेतन निर्धारण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, महागाईनुसार वेतन आणि भत्ते निर्धारीत करावे. सर्वच ग्रेडच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करावा. आदी मागण्यासाठी हा संप होणार आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सच्या बॅनरखाली बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या फोरमसोबत देशभरातील ९ बँक यूनियन आहेत. यात एसबीआयसह इतर सरकारी बँकांचे १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. ३० मे रोजी सकाळी ६ वाजतापासून एक जूनच्या सकाळी ६ पर्यंत कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.