महाराष्ट्र


हिंदुस्थान पेट्रोलियमचे ५०० पंप मंजूर.. अशी घ्या डीलरशीपनवी
  • Published at : 24-05-2018 16:47:09

दिल्ली : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक एम.के सुराना यांनी कंपनीच्या एक्सपेंशन प्लानची घोषणा केली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात हिंदुस्थान पेट्रोलियम ने ६६९ नव्या पेट्रोलपंपांना मंजुरी दिली. सध्या देशामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम चे १५ हजार ०६२ रिटेल आऊटलेट आहेत. आता येणाऱ्या २०१८-१९ वर्षात ५०० आऊटलेट खोलण्याची गरज असल्याचे सुराना यांनी सांगितले. पेट्रोल पंपाचा मालक बनण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणं गरजेच आहे. यासोबतच आपल वय २१ ते ५५ वर्षांपर्यंत असावंं. आपल पेट्रोलपंप उघडण्यासाठी तुमच्याकडे जागा असणं गरजेच आहे. स्वत:ची नसेल तरीही जमिन मालकाकडुन NOC (ना हरकत दाखला )घ्यावी लागेल. तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्याच्या जमिनीवर पेट्रोल पंपासाठी अर्ज करु शकता. तरीही NOC (ना हरकत दाखला ) आणि Affidait ( शपथपत्र ) बनवावे लागेल. जमिन लीजवर असल्यास तसा करार असण गरजेच आहे. यासोबतच Registered sales deed किंवा lease deed असण गरजेच आहे. शेती भागात जमिन येत असल्यास त्याच रुपांतर करुन गैर कृषी भागात आणाव लागेल. तुमच्याकडे जमिनीचे संपूर्ण कागदपत्र आणि नकाशा असावा. पेट्रोल पंप उघडण्यासाठी खर्च पेट्रोलियम कंपनीवर ठरतो. देशात ग्रामीण आणि शहरी अशा २ प्रकारचे पेट्रोलपंप असतात. त्यामुळे याचा खर्चही वेगवेगळा असतो. प्रॉपर्टीचा खर्च वगळल्यास ग्रामीण भागात पेट्रोलपंप उघडण्याला १२ लाखापर्यंत खर्च आहे. शहरी भागात यासाठी २५ लाखापर्यंत खर्च येईल. तरीही जागेनुसार या किंमतीत चढउतार होऊ शकतो.