News Marathi 24


महाराष्ट्र


पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
  • Published at : 23-05-2018 17:04:00

नवी दिल्ली/प्रतिनिधी : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे देशभरातून मोदी सरकारविरोधात भडका उडाला आहे.गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. महागाईचा मार आणि खिशाला भार पडत असल्यानं लोक मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. लोकांच्या संतापाचा भडका उडाला असतानाच, विरोधी पक्ष काँग्रेसनेही मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकार एक लिटर पेट्रोलमागे २५ रुपये घेत आहे. हा पैसा थेट जनतेकडूनच वसूल केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना, लिटरमागे सरकारची १५ रुपयांची बचत होत आहे. त्यात सरकारकडून १० रुपयांचा अतिरिक्त करही वसूल केला जात आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले. पेट्रोलच्या दरात आज आणखी ३० पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल दर प्रतिलिटर ७६.८७ रुपयांवर पोहोचले. तर मुंबईत पेट्रोल ८४.९९ रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या मोदी सरकारने यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यात पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.