महाराष्ट्र


'टाटा'च्या गाड्यांचं उत्पादन बंद
  • Published at : 23-05-2018 14:32:32

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतीयांची पहिली पसंती ठरलेल्या 'इंडिका' आणि 'इंडिगो' या गाड्यांचं उत्पादन टाटा मोटर्सनं बंद केलंय. कमी झालेल्या विक्रीमुळे 'टाटा'नं हा निर्णय घेतला आहे. मार्च २०१८पर्यंत 'इंडिका'चे २,५८३ तर 'इंडिगो'चे १,७५६ युनिट्स विकले गेले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत हा खप खूपच कमी आहे. त्यामुळेच एप्रिलपासून या गाड्यांचं उत्पादन थांबवण्यात आलं आहे. उत्पादन बंद झालं असलं तरी या गाड्या वापरणाऱ्यांना विक्रीनंतरच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत.