महाराष्ट्र


खादी ग्रामोद्योग आयोग; शेतकरी व महिला मेळावा संपन्न.
  • Published at : 23-05-2018 12:12:22

ढेबेवाडी प्रतिनिधी: आण्णासाहेब पाटील नगर येथे खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार चा शेतकरी व महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शेतकरी, महिला व बेरोजगार युवा वर्ग यांना मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग तसेच शिवणकाम, ब्युटीपार्लर, ज्वेलरी मेकिंग अशा प्रकारे ३०० पेक्षा अधिक उद्योगांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी खादी ग्रामोद्योग गोवा प्रांत श्री. एस. एस. तांबे साहेब, मोरया ट्रेनिंग सेंटर वाई संचालिका सौ. दिपाली घाडगे, पुणे ऑफिस श्री . भिलारे साहेब व ढेबेवाडी विभागीतील केंद्रचालक श्री. अनिल कुंडलिक सूर्यवंशी व श्री. सागर हिंदुराव शिंदे यांच्या हस्थे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी, युवक व महिला उपस्थित होत्या.