महाराष्ट्र


मेस्सीने जिंकला ५ व्यांदा गोल्डन बूट
  • Published at : 22-05-2018 10:15:59

अर्जेंटिना वृत्तसंस्था: फुटबॉल स्टार लीयोनेल मेस्सीने ५ व्यांदा युरोपिअन गोल्डन बूट हा फुटबॉल मधील प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला असून हि कामगिरी करणारा तो एकमेव फुटबॉलपटू बनला आहे. टीम बार्सिलोनाने स्पॅनिश लीग मध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात रियल सोसिब्दाद टीमला १-० ने हरवून हा सामना जिंकला. त्याचबरोबर स्पॅनिश लीगच्या २०१७-१८ सिझन मध्ये मेसीने बार्सिलोना टीम कडून खेळताना ३४ गोल करून ६८ अंक मिळविले. यापूर्वीही मेसीने २०१०, २०१२,२०१३ आणि २०१६ मध्येही गोल्डन बूट पुरस्कार जिंकला आहे. यंदा मेसी बरोबर लिवरपूलचा मोहमद सलाह आणि टोटेनहानचा हॉटस्पर चा हॅरी काने हेही या पुरस्काराचे दावेदार होते. सलाह ३२ गोल सह ६४ अंकावर तर काने ३० गोल सह ६० अंकावर होता. या पुरस्कारासाठी स्पेन, जर्मनी, इंग्लंड, इटालियन आणि फ्रेंच लीग मध्ये खेळाडूने नोंदविलेले गोल विचारात घेतले जातात. प्रत्येक गोल ला दोन अंक खेळाडूला मिळतात.