महाराष्ट्र


कर्नाटक निकालाचा शेअर बाजारावर परिणाम
  • Published at : 15-05-2018 16:33:26

मुंबई : कर्नाटक निवडणूकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्या नसूनही बहुमत मिळवू शिकलेली नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या हातातील बाजी पलटताना दिसत आहे. सेंसेक्स ४५० अंकानी तुटलं आहे. तर निफ्टी जवळ पास १२० प्वाईंटने कमी झालेलं आहे.आता बाजार बंद होत असताना ११ अंकानी खाली आलं असून ३५५३५ वर पोहोचले आहे तर निफ्टी १२ अंकानी खाली आली असून १०८०० यावर स्थिरावली आहे. काही वेळापूर्वी कर्नाटकमध्ये भाजपने बहुमताचा जादूई आकडा गाठला होता. मात्र हळू हळू हे चिन्ह पालटताना दिसलं. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन सरकार स्थापनेची तयारी करत आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. ज्या ठिकाणी शेअर बाजार वरून ४५० प्वाईंट वरून खाली येण्याच्या परिस्थितीत दिसत आहे. तर निफ्टी १२० अंकावरून खाली येत १०८०० खाली आलं आहे. दिवसाच्या सुरूवातीला मिडकॅप आणि स्मॉलकॅफमध्ये चांगली उसळी मारताना दिसली. मात्र जस जसा दिवस पुढे सरकला मिडकॅप इंडेक्स १.२५ टक्क्यांनी खाली आलं. मिडकॅपमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाल्यामुळे सर्वात मोठा फटका बसला. मिडकॅप घसरून १६१३१ या स्तरावर पोहोचला आहे. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.१३ टक्के वाढ झाली असून १७६३३ स्तरावर पोहोचले आहे.