महाराष्ट्र


मुंबई-राजस्थानमध्ये प्लेऑफ साठी लढत
  • Published at : 13-05-2018 14:58:24

मुंबई: सलग तीन विजय मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सशी आज वानखेडे स्टेडियमवर “प्लेऑफ” साठी लढत होणार आहे. या दोन्ही संघांचे आता ११ सामन्याबरोबर १० गुण झालेले आहेत. त्यामुळे बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी हा सामना अत्यंत चुरशीचा अहोणार आहे. मुंबईने गेल्या सामन्यात कोलकात्यावर १०२ धावांनी मात केली होती. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला हा संघ राजस्थानला सामोरा जाईल. मुंबईमधून सूर्यकुमार, लुईस, कुणाल व हार्दिक पांड्या, रोहित शर्मा यांना जीव तोडून फलंदाजी करावी लागणार. राजस्थानला आधार असेल तो जोस बटलरचा. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाना कदाचित स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताही निर्माण होईल.