महाराष्ट्र


कार्ल मार्क्स यांचा दोनशेव्या जन्मदिनानिमित्त "प्रेषित अर्थशास्त्री:कार्ल मार्क्स" पुस्तकाचे प्रकाशन
  • Published at : 06-05-2018 15:35:34

मुरगुड प्रतिनिधी: समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांनी संपादित केलेल्या "प्रेषित अर्थशास्त्री:कार्ल मार्क्स" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इचलकरंजी येथील प्रबोधिनीच्या सभागृहात जगविख्यात विचारवंत कार्ल मार्क्स यांचा दोनशेव्या जन्मदिनानिमित्त शनिवार दि ५ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर होते.अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.पी.एस.कांबळे होते.प्रसाद कुलकर्णी व निहाल शिपुरकर हे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.पुस्तकाचे संपादक प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांनी प्रास्ताविकातून या प्रकाशनामागील भूमिका स्पष्ट केली.प्राचार्य डॉ.पी.बी.कुलकर्णी, प्रा.डॉ.व्ही.बी.ककडे,प्रा.डॉ.अनिल वावरे,प्रा.डॉ.अनिल पडोशी, प्रा.डॉ.राहुल म्होपरे, प्रा.डॉ.भालबा विभूते यांनी पुस्तकासंदर्भात मनोगते व्यक्त केली.प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांनी मार्क्स यांच्या विचारधारेचे सैद्धांतिक विवेचन केले.प्रा.डॉ.पी.एस.कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्क्स यांच्या विचारांचे समकालीन महत्व स्पष्ट केले.शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या या समारंभास प्राचार्य डॉ.जे.एस. पाटील,प्राचार्य जी.जे.ताम्हणकर, डॉ.उल्हास माळकर,डॉ.माधुरी देशमुख, डॉ.संजय ठिगळे,डॉ.सुभाष दगडे,डॉ.श्रीकृष्ण महाजन,राहुल यादव यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक,संशोधक,विद्यार्थी व जिज्ञासू मोठया संख्येने उपस्थित होते.प्रा.राजकुमार वाईंगडे यांनी आभार मानले.या २६८ पानी पुस्तकात तेरा भागात २८ अभ्यासकांनी मार्क्स यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे.पुस्तकाचे मूल्य ₹ ३००/-आहे.