बालिंगा येथील सराफ पेढीवरील दरोड्यातील मोटारसायकली सापडल्या

बालिंगा; बालिंगा ता. करवीर येथील कात्यायनी ज्वेलर्सवर गुरूवारी भर दिवसा दरोडा टाकून दरोडेखोरांनी दोन कोटीचे दागिन्यांची लुट करून मालक रमेश माळी, व जीतु माळी यांना मारहाण व गोळीबार करुन जबर जखमी करून हल्लेखोर जमलेल्या जमावावर गोळीबार करून गगनबावड्या कडे मोटारसायकल वरून धुम ठोकली होती. वरील पडलेल्या दरोडयात वापरलेल्या दोन मोटारसायकली आज खुपीरेच्या पश्चिमेला असलेल्या नागरिका स्पीनींग मिलच्या शेतवडीत सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत त्याचा कसुन तपास चालू असुन ,जखमींवर खाजगी इस्पितळात उपचार चालू आहेत.

बालिंग्याच्या मुख्य रस्त्यावर बाजारपेठ असून नेहमी गर्दी असते अशा गजबजलेल्या परिसरात भर दिवसा गोळीबार करून लुटमार केल्याने नागरीकात व दुकानदार यांचे मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.