कोल्हापुरातील आंदोलनाला हिंसक वळण

कोल्हापूर: मोबाईलच्या स्टेटसवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद आहे. दरम्यान, हे आंदोलन सुरू असताना आंदोलक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली सुरू झाली. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

यामुळे शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड परिसरामध्ये गर्दी पांगली. दरम्यान या जमावाने कोल्हापूर शहरात रॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्याला पोलिसांनी आक्षेप घेतला आणि रॅलीला परवानगी दिली नाही. त्यातून वाद वाढत गेला. गंजी गल्लीत जमावाने दगडफेक केली. मटण मार्केट परिसरातही काही ठिकाणी मोडतोड झाली. अखेर पोलिसांकडून जमावावर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे महापालिका चौक परिसरामध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. येथे एका रिक्षाची मोडतोड करण्यात आली तर चप्पल लाईनला असलेल्या हॉलीवुड शूज या दुकानाची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. चौकात चपलांचा अक्षरश: खच पडलेला आहे.