” शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत शिवराज्यभिषेक दिन सोहळा दिमाख्यात संपन्न

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत ऐतिहासिक खासबाग चौक, येथे शिवराज्यभिषेक दिन सोहळा दिमाख्यात संपन्न झाला.

करवीरपीठाचे श्री जगद्गुरु शंकराचार्य प्रमुख यांचे उपस्थितीत कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करणेत आले. यावेळी शिवरायांचा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अध्यक्ष प्रदीप मराठे, बाळासाहेब देसाई, किशोर भोसले, अजित जाधव, विवेक कोरडे, विलास गौड, राजु काटे, राजु जाधव, प्रशांत आयरेकर, बाळासाहेब शिंदे, गणेश भोसले, शिवाजी जाधव, सुनिल कांदेकर, बबन कांबळे, मदन जाधव यांच्यासहभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.