50 वर्षे शिवराज्यभिषेकदिन सोहळा साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी : मालोजीराजे छत्रपती

“शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे ऐतिहासीक सेटची उभारणी

कोल्हापूर : शिवराज्याभिषेकदिन सोहळा म्हणजे स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुंदर घटना. गेल्या पन्नास वर्षापासून कैलास गडची स्वारी, शिवालय भजनी मंडळाच्यावतीने श्री शिवराज्याभिषेक सोहळा अखंडितपणे साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे असे मत श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

मंगळवार पेठेतील “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत ऐतिहासिक खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भव्य राज दरबार हॉल हा ऐतिहासीक सेट उभा करण्यात आला आहे. या सेटच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. युवा उद्योजक व काँग्रेसचे औद्योगिक विभागाचे प्रदेश सचिव सत्यजित चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते.

मालोजीराजे छत्रपती यांचे हस्ते ऐतिहासिक सेटचे उद्घाटन करण्यात आले. तर सत्यजित जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमेची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी विजय देवणे, आर.डी पाटील, विनायक साळोखे, दीपक चोरगे, गणेश देवणे,बाळासाहेब देसाई, बाळासाहेब पोवार, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मराठे, विवेक कोरडे, विलास गौड, किशोर भोसले, अजित जाधव, राजु जाधव, शिवशाहीर अजित आयरेकर, रोहित कारंडे,संजय आयरेकर, यांच्यासह कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.