उन्हाळात अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून उपाय

उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी घरगुती उपाय.

बहुतेक लोकांना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाही. म्हणून ते कोणताही पदार्थ आधी गरम करतात आणि मगच खातात. परंतु कोणताही पदार्थ एकपेक्षा जास्त वेळा गरम केल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच उन्हाळ्यात अन्नपदार्थ वारंवार गरम करणे टाळा.

टोमॅटो आणि कांद्याशिवाय कोणत्याही भाज्या किंवा कोणत्याही पदार्थांना चव लागत नाही. पण स्वयंपाकात याचा कमीत कमी वापर केल्याने अन्न जास्त काळ टिकून राहते. जर आपल्याला टोमॅटो, कांद्याशिवाय कोणताही पदार्थ खायला आवडत नसेल तर तुम्ही तो पदार्थ शिजवल्यानंतर तीन ते चार तासांच्या आत खाऊन संपवा, जेणेकरून तो खराब होण्याच्या आत संपवला जाईल. शक्यतो उन्हाळ्यांत अन्नपदार्थांमध्ये टोमॅटो, कांद्याचा वापर कमी करावा म्हणजे पदार्थ

उन्हाळ्यात गरम मसाले, लसूण, आले मोठ्या प्रमाणात असलेले पदार्थ लवकर खराब होतात. अशा वेळी अन्न दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी शक्य तितके कमी मसाले वापरावेत. यामुळे आपल्या शरीरातील उष्णताही कमी होईल. म्हणूनच आहारतज्ज्ञ उन्हाळ्यात कमी तेलकट आणि मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यांत जेवण बनवताना त्यात गरम मसाल्यांचा वापर थोडा कमी करावा यामुळे अन्नपदार्थ लगेच खराब होत नाहीत.