दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होणार?

पुणे: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

कारण बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संकल्पना समोर आणली आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं करण्यासाठी बालभारतीने बालभारतीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.विद्यार्थ्यांना आता सगळ्या विषयांचे वेगवेगळे पुस्तकं घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. बालभारतीकडून पुस्तकांचे एकूण 4 भाग करण्यात आले आहेत. या भागांमध्ये सर्वच विषयांचे पाठ असणार आहेत. विशेष म्हणजे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना महत्त्वाची नोंद करता यावी यासाठी पुस्तकातच वहिची पानं जोडण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुस्तकावरच लिहिता येणार आहे.