आरोग्य संघटनेकडून शुगर फ्री स्विटनर्स न वापरण्याचा सल्ला

वजन कमी करण्यासाठी लोक शुगर फ्री स्वीटनर्सचा वापर करतात. जर काहीजण साखर खाणच सोडून देतात. जागतिक आरोग्य संघटनेनं शरीराचं वजन नियंत्रित करण्यासाठी तसंच रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरात असलेले शुगर फ्री स्विटनर्स न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्याही खाद्यपदार्थात किंवा पेय पदार्थात आर्टिफिशिल स्विटनर्स मिसळल्यास वजन कमी करण्यात कोणताही फायदा होत नाही. याऊलट लोकांनी इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, नैसर्गिकरित्या गोड असलेले पदार्थ खाणे, जसे की फळे किंवा गोड न केलेले पदार्थ आणि पेये.फांसिस्को ब्रांका  यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, NSS (कृत्रिम साखर) हा आहारातील आवश्यक घटक नाही आणि त्याचे कोणतेही पौष्टिक मूल्य नाही.  लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जीवनाच्या सुरुवातीपासूनच आहारातील गोड पदार्थांचे प्रमाण कमी करावे. डब्लूएचओच्या मते आर्टिफिशयल स्वीटनर्सचा वापर केल्यानं कॅन्सर किंवा हृदयरोगही उद्भवू शकतो. याचे शरीराला कोणतेही फायदे मिळत नाहीत.कृत्रिम गोड पदार्थ इंसुलिनची पातळी आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणात व्यत्यय आणू शकतात.  कृत्रिम स्वीटनर्स साखरेपेक्षा गोड, परंतु कॅलरीजशिवाय डिझाइन केलेले आहेत. यामुळे गोड पदार्थांचे अतिसेवन होऊ शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते.