‘मातृदिन’ एक दिवस आईला समर्पित

मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा एक दिवस आईला समर्पित असून या दिवसाच्या निमित्ताने तिच्या आनंदाचा तिच्या भावनांचा विचार व्हावा हा हेतू असतो. जेव्हा नवीन माता स्वतःसाठी वेळ काढत नाहीत, तेव्हा ते त्यांना चिडचिड होते आणि त्यांचा राग त्यांच्या या परिस्थितीवर निघतो. नवीन मातांनी त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रेशर घेऊ नकानवीन मातांचे मानसिक आरोग्य देखील अनेक वेळा अस्थिर होते कारण त्या स्वतःवर कामाचा खूप दबाव घेतात. साहजिकच मुलाच्या आगमनामुळे स्त्रीवर कामाचा ताण वाढतो. मुलाची काळजी घेण्यापासून ते तुमच्या आरोग्यावर आणि आहारावर बारीक लक्ष ठेवण्यापर्यंत तुमच्यावर जबबादाऱ्या असतात. परंतु नवीन मातांना कामाचा ताण कमी करणे आवश्यक आहे. याशिवाय काही कारणाने काही काम पूर्ण होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. काम चोखपणे पूर्ण करण्याचे ओझे घेणे टाळास्वतःसाठी वेळ काढानवीन मातांकडे स्वतःसाठी खूप कमी वेळ असतो. त्यांना त्यांच्या मुलाची चोवीस तास काळजी घ्यावी लागते. कधी त्याला आंघोळ घालणे, कधी खाऊ घालणे, कधी डायपर बदलणे. नवीन आई या सगळ्या कामात इतकी गुंतून जाते की तिला तिचं व्यक्तिमत्व कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे. तुमच्या मनाचा विचार करा. जास्त वेळ काढता येत नसेल तर दीड तास स्वतःसाठी काढता येईल. निदान 10-15 मिनिटेतरी स्वतःसाठी काढा.