कोल्हापूर शहरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : चंबूखडी टाकीवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्ती आज करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद राहणार आहे.

बालिंगा येथील जल उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागांमध्ये आज दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार असून उद्या (गुरुवारी) पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.शहरातील एबी वॉर्ड सलग्नित उपनगरे व शहरांतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, साने गुरुजी वसाहत ,संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड ,क्रशर चौक ,आपटे नगर टाकी परिसर, कनेरकरनगर, राजोपाध्येनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी ,शिवाजी पेठ, तटाकडील तालीम ,उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश,महालक्ष्मी मंदिर परिसर ,मंगळवार पेठ काही भाग, महाद्वार रोड गंगावेश ,शुक्रवार पेठ ,बुधवार पेठ, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, गुजरी ,खानविलकर पेट्रोल पंप, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही. उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.