जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेली जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे.सर्व कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन (पेन्शन) योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारला संपाची नोटीस देण्यात आली असून, आता ही आरपारची लढाई असेल, असे कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले.