संघर्ष वक्तृत्व स्पर्धेतून विचारांची क्रांती होईल -श्रीमंत शाहू महाराज

कोल्हापूर : संघर्ष राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतून विचारांची क्रांती होऊन सामाजिक समता अखंड राहील असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. उत्तमदादा कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. यावर्षी राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संघर्ष राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 34 स्पर्धकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी आर.पी.आयचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे राज्य सचिव मंगलराव माळगे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष रुपाताई वायदंडे हे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रीमंत शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती व आंबेडकरी चळवळीचे पुस्तक देऊन तसेच कोल्हापुरी फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दिलेल्या अनेक विषयातून वक्तृत्व स्पर्धेची मांडणी करून उपस्थितांना वैचारिक प्रबोधनाची देण देण्याचे काम राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धकांनी केले. या स्पर्धेसाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन संयोजन वैभव प्रधान व विजय काळे यांनी केलं. या स्पर्धेचे अनुक्रमे क्रमांक प्रथम क्रमांक तेजस्विनी पांचाळ, द्वितीय क्रमांक अलिषा मोहिते, तृतीय क्रमांक गणेश लोळगे तर उत्तेजनार्थ श्रद्धा कांबळे, सिद्धेश मिसाळ,संघर्ष कांबळे यांनी पटकाविला त्यांना ऐतिहासिक गैबी चौक येथे वाढदिवसाच्या दिवशी रोख रक्कम, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

परीक्षक म्हणून अनुराधा पाटील व राजू भोरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेवेळी राजेंद्र ठीकपुर्लीकर,दत्ता मिसाळ, सुखदेव बुध्याळकर, गुणवंत नागटिळे, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के, संजय लोखंडे, अविनाश शिंदे, जयसिंग पाडळीक, बाबासाहेब कागलकर, बी. आर.कांबळे, सचिन मोहिते, सतीश माळगे यांसहित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.