कुंभि कासारी निवडणूक दुपारी चार वाजेपर्यत ८०.२४ टक्के मतदान

बालिंगा: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना चे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज दुपारी चार वाजेपर्यंत ८०.२४ टक्के मतदान झाले असून अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या झुंबड रांगा लागल्या आहेत.

त्यामुळे अंदाजे ८५ ते९० टक्के मतदान होणेची शक्यता आहे. काही मतदार केंद्रावर वातावरण तंग झाले आहे.

कोगे व मांडुली येथे अजित नरके गटाने वादावादी केलेने बिकट प्रसंग निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून वातावरण शांत केले आहे.

जास्तीत तशजास्त मतदान कोगे केंद्रावर९०.९१ टक्के झाले असुनकोलोली केंद्रावर कमी म्हणजे ७४.२७ टक्के मतदान झाले आहे.