तुर्कीत भूकंपाचा तीव्र झटका; झोपेत अनेकांचा मृत्यू

अंकारा : तुर्कीत आज पहाटे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 एवढी नोंदवली गेली. लोक गाढ झोपेत असतानाच हा भूकंप झाल्याने अनेकांचा झोपेतच मृत्यू झाला.

या भूकंपामुळे कमीत कमी 150 इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यातून भूकंपाची दाहकता दिसून येते. तुर्कीत आज पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. या इमारतीखाली अनेक लोक दबले गेले आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.केवळ तुर्कीच नव्हे तर इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराकमध्येही भूकंपाचे झटके जाणवले आहेत. तुर्की आणि ईराणच्या सीमेवर यापूर्वी भूकंप आला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी नोंदवली गेली होती.सीरियात 100 हून अधिक दगावलेया भूकंपामुळे एकट्या सीरियात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार तुर्की आणि सीरियातील भूकंपामुळे मृतांचा आकडा 1 हजार लोक दगावल्याचं सांगितलं जात आहे.