शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या….

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत असून शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे.

निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.निलेश माझिरे यांच्या पत्नीने विष प्राशन केलं होतं, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्रथामिक अंदाज वर्तवला जात आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या? शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.