चित्रकला स्पर्धांमधून भविष्यात चांगले चित्रकार घडतील: सौ नवोदिता घाटगे

कागल येथील चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटपवेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे शेजारी संजय पाटील दगडू शेणवी व इतर

कागल : चित्रकला स्पर्धांमधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. शिवाय अशा स्पर्धांमधून भविष्यात चांगले चित्रकार घडतील. असा विश्वास राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष सौ नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केला.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणवेळी त्या बोलत होत्या.येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलमध्ये झालेल्या चित्रकला स्पर्धेत 500 अधिक विद्यार्थी सहभागी झाले.आठवी ते दहावीच्या गटात सुजल माने, स्नेहल शिंदे तर अकरावी ते बारावीच्या गटात विद्या बुरसे, विश्वजीत तांबेकर, करण कोळी विजेते ठरले. सौ. घाटगे पुढे म्हणाल्या, स्पर्धा कोणती असूदे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी मोबाईल संगणकचा मर्यादित व गरजेपुरताच वापर करावा. अभ्यासाबरोबर छंद जोपासावेत. यावेळी टी एनचव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून मिलिंद देसाई व रितेश माने यांनी काम पाहिले. स्वागत मुख्याध्यापक एस.डी.खोत यांनी केले प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केले.आभार दगडू शेणवी यांनी मानले.