महावीर महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा

बालिंगा/ मोहन कांबळे कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात मध्ये परीक्षेत उत्तम गुण मिळवून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी १२ वी विज्ञान शाखेत , ९३.६७% मार्कस मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. रुचिता रविंद्र पोतदार या विद्यार्थिनीचा सत्कार श्री दिलीपसिंह घाटगे विधिज्ञ यांचे हस्ते करण्यात आला. कु. रुचिता हिला नीट परीक्षेत ४५३ मार्कस मिळाले असून तिला BAMS ला प्रवेश मिळालेमुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रूचीता ही जिल्हा परिषद कॉलनीची रहीवाशी आहे.