शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

कागल येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार पी. एन. पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक

कागल : येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन या प्रधान कार्यालयाच्या प्रांगणात वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित होते. राजकीय सामाजिक सहकार कला क्रीडा कृषी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते यांच्यासह समाजातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आमदार पी एन पाटील खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.श्री घाटगे यांना पुस्तके वह्या व रुमाल बुके स्वरूपात नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य जीवन साळुंखे यांनी स्वलिखित दोनशे पुस्तके शुभेच्छा रुपात दिली.शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांमध्ये बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळची माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील,बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर,माजी महापौर सत्यजित कदम, सुनिल कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, अॕड सुरेश कुराडे, संभाजी आरडे,भगवान काटे, के.जी. नांदेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत,अभिषेक बोंद्रे,डाॕ संदीप पाटील,अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील, पृथ्वीराज यादव, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक कैलास जाधव,उद्योगपती सोहम शिरगावकर पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, दीपक वाकचौरे, मोनिका खडके यांचा समावेश होता.

चौकट

१)यांनी दिल्या दूरध्वनीवरून शुभेच्छा घाटगे यांना

यावेळी राजे समरजीतसिंह घाटगे यांना दै.पुढरीचे संपादक प्रतापसिंह जाधव, कार्यकारी संपादक डॉ.योगेश जाधव, खास. धनंजय महाडिक,आमदार प्रकाश आबिटकर, आम. ऋतुराज पाटील, सकाळचे निवासी संपादक निखील पंडितराव,माजी आम.सुरेश हाळवणकर, गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी आम. महादेवराव महाडिक, माजी आम. अमल महाडिक, माजी आम.के. पी. पाटील, अखिलेशराजे घाटगे,अण्णाभाऊ समुहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, दत्त साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिवसेनेचे संजय पवार, संग्रामसिंह कुपेकर, हमिदवाडा साखर कारखान्याच्या संचालिका सौ. राजश्री चौगुले, डॉ. संजय देसाई आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

२)शहरासह तालूक्यात गावोगावी विविध उपक्रम

राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहर व तालूक्यात गावोगावी रक्तदान शिबिर, आरोग्य शिविर, विविध स्पर्धा, गोरगरीब महिलांना साड्या वाटप, स्नेहभोजन, रुग्णांना फळे वाटप , हळदी-कुंकू, कीर्तन, व्याख्यान, ऊसतोडणी कामगार यांच्या मुलांना खाऊ वाटप, मूकबधिर मुलांना भोजन वाटप ,वृद्धाश्रमांना भेटवस्तू वाटप, शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप, गरीब पाच मुलींच्या नावाने एक हजार रुपयांची ठेव , अशा विविध उपक्रमांचे नागरिकांनी उत्सफुर्तपणे आयोजन केले. राजमाता जिजाऊ मेला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रम येथे धान्य वाटप केले.

३)आमदार पडळकर यांनी विमानतळावरच साजरा केला वाढदिवस

जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय हवामान मंत्री ज्योतिरादित्य सिंधी यांच्या स्वागतासाठी उजळाईवाडी येथील विमानतळावर आमदार गोपीचंद पडळकर व राजे समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. या ठिकाणीच आमदार पडळकर यांनी घाटगे यांना स्वतः फेटा बांधून श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींनीही घाटगे यांना शुभेच्छा दिल्या.